शनिवार, २९ सप्टेंबर, २०१२

प्रेम हे काय असतं...

प्रेम हे काय असतं...
एका साठी फक्त आठवण तर
एकासाठी काहीच नसतं !

प्रेम हे काय असतं..
एका साठी फक्त विचार तर एकाच्या ध्यानी-मनीच नसतं !

प्रेम हे काय असतं...
एका साठी वेड लावणार तर एकाला कोण हा वेडा हेच माहित नसतं !

प्रेम हे काय असतं..
एकाच्या डोळी ओलावा तर एकाच्या मुखी हास्य असतं !

प्रेम हे काय असतं
एकाला दूर जाऊनही जवळच वाटतं तर एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसतं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा